Club News
  • No News reported.

Bhivghar project by Mahad

Bhivghar project
09 Oct, 2019

Beneficiaries : 360

Cost : 6000

President : Rajendra Mehta

Rotarian Team : NA

Non Rotary Partner : 6

Description :
*श्रृंkhala- Mahad* रोटरी क्लब ऑफ महाड आणि *श्रृंkhala- महाड यांच्या संयुक्त विद्यमाने भिवघर येथे महिलांसाठी कंपोस्टिंग आणि बायोक्लीनर चे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. यावेळी एकूण 35 प्रशीक्षणार्थी महिला उपस्थित होत्या. यावेळी सौ ममता मेहता यांनी कचऱ्यापासून खतनिर्मिती कशी केली जाते व त्याचा उपयोग कसा, कुठे व का करायचा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. सौ उज्वला कोळेकर यांनी कमी वजनाचे प्लास्टिक वेस्ट चे दुष्परिणाम सांगून , ते साठवून रिसायकलिंग ला देण्यासाठी आवाहन केले. प्रा अपूर्वा देसाई यांनी बायोक्लीनर हे पर्यावरणासाठी कसे चांगले असते हे प्रात्यक्षिकासह पटवून दिले. यासाठी भिवघर चे श्री व सौ किशोर पवार आणि सौ स्मिता कळंबे यांचे सहकार्य लाभले. यावेळी रोटरी क्लब ऑफ महाड चे अध्यक्ष श्री राजन मेहता आणि सेक्रेटरी श्री संतोष नगरकर उपस्थित होते. राजन मेहता यांनी भिवघर येथील महिलांना सांगितले की *श्रृंkhala- Mahad च्या माध्यमातून प्रथमच खेडयातील महिलांपर्यंत रोटरी पोहोचली आहे आणि याचा पुरेपूर लाभ येथील महिलांनी घ्यावा असे आवाहनही केले. ममता मेहता यांनी महिलांच्या शंकांचे निरसन करून शेवटी सर्वजण एकमेकांचे आभार मानून शिबिराची सांगता झाली.

Images :
Bhivghar project Bhivghar project Bhivghar project